प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; निफाड पोलिस व नगरपंचायत कडून शहरातील सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात आले होते की कोरोनाच्या साथीमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात आले या आवाहनास गणेश मंडळांनी व नागरिकांनी प्रतिसाद देत यावर्षी गणेश विसर्जनाची कोणती हि प्रकारची मिरवणूक काढण्यात आली नाही.
गणेश भक्तांनी निफाड नगरपंचायत व निफाड पोलिस प्रशासनास सहकार्य केले.या वर्षी जास्तीत जास्त नागरिकांनी घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करून केले.तसेच निफाड नगरपंचायत कडून ठिक ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी कृत्रिम व्यवस्था करण्यात आली होती.
गणेश विसर्जन करते वेळी सर्वांनी गर्दीचे नियम पाळले व मास्क वापर करून कोरोनाचे नियम पाळून गणेश विसर्जन केले. तसेच निफाड नगरपंचायतने तयार केलेल्या शहरातील कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शहरातील गणेश मंडळ व गणेश भक्त परस्पर नदीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन न करता नगरपंचायतीने ठरविलेल्या ठिकाणी जाऊन गणेश विसर्जन केले. निफाड पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे गणेश विसर्जन प्रसंगी निफाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश विसर्जन विना विघ्न पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गणेश विसर्जन विना मिरवणुक शांततेत पार पडले .
यासाठी निफाड पोलिस निरीक्षक रंगराव सानप व कर्मचारी तसेच मुख्याधिकारी डॉ.श्रीया देवचके निफाड नगरपंचायत यांनी गणेश विसर्जन नियोजन केले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम