नाशिकच्या सोनाली मटण भाकरी हॉटेल मध्ये युवकाची हत्या

0
69

नाशिक प्रतिनिधी : बुधवारी रात्री मुंबई हायवे लागत स्टेट बँके जवळ सोनाली मटन भाकरी हॉटेलच्या परिसरात एकास फरशी व खुर्चीने जबर मारहाण करून खून केल्याची घटना घडली. यात प्रसाद भालेराव नामक 25 वर्षीय युवकाची हत्या झाली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस आयुक्तल्याच्या इन्स्पेक्शन करण्यासाठी महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस महासंचालक नाशिक दौर्यावर असतांना ही घटना घडल्याने प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून जेवणाच्या वादावरून खून झाल्याचा याबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली, स्टेट बँक जवळील सोनाली हॉटेल जवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास तीन ते चार युवकांनी प्रसाद भालेराव ( वय २५ ) रा . उपनगर परिसर नाशिकरोड या युवकाला किरकोळ कारनावरुन फरशीने जबर मारहाण केली. या घटनेत भालेराव नामक युवक गंभीर जखमी झाला. उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.

फक्त पार्सल सेवा चालू असतांना काही युवक बेकायदेशीर बसून जेवत होते. हॉटेल अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे हॉटेल सुरु असून .या घटनेनंतर वपोनी कुमार चौधरी, गुन्हे शाखा सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्यासह घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व सेवक दाखल झाले होते. दरम्यान, रात्री उशिरा अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मारहाण करणाऱ्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे . पुढील तपास अंबड पोलिस करीत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here