नाशिक – सिटी सेंटर मॉलजवळ बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

0
20

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास एका वाहनधारकास हा बिबट्या दिसला असता, त्याने त्याचा व्हिडीओ काढला. नंतर या बिबट्याने वॉल कंपाउंड वरून धूम ठोकली.

या वाहनधारकाने काढलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक शहरातील उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलचा परिसर हा गजबजलेला आहे. मात्र शेजारी शेती असल्याने, बिबट्या आला असावा. असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. सिटी सेंटर मॉल आणि शेजारीच असलेल्या ठक्कर डोमच्या दरम्यान हा बिबट्या दिसून आला होता.

दरम्यान, बिबट्याबाबत माहिती मिळताच वन विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी येऊन शोधमोहीम राबवली. मात्र बिबट्याचा काही थांगपत्ता नव्हता. त्यामुळे हा बिबट्या शेजारील शेतातून पसार झाला असेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

दरम्यान, नाशिक शहरात आत्तापर्यंत बऱ्याच वेळा बिबट्याचे दर्शन घडून आले आहे. बऱ्याच जणांवर बिबट्याने बचावासाठी म्हणून हल्ला देखील केला होता. आता पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

जंगलांमधील झाडांची होत असलेली कत्तल, वाढते शहरीकरण या कारणाने बिबट्याचे वास्तव्यठिकाणच धोक्यात आले आहे. याच कारणाने त्यांचे शहरामधील येण्याचे प्रकार वाढले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here