देविदास बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; जैन समाजाचा सर्वात मोठा पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व शनीवार (४ सप्टेंबर) पासून सुरू झाले होते. पुढील आठ दिवस जैन धर्मातील स्थानकवासी पंथातील बांधव यांनी हा पर्युषण पर्व साजरा केला. जैन बांधवांनी ८ दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं काटेकोरपणे पालन केले.
पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं आणि त्यामुळे याला पर्वाधिराज पर्व असंही म्हटलं जातं. या पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे) यांचा समावेश आहे.पालन केले व या काळात सर्व श्रावकांनी सामाजिक अंतर राखून जैन मुनींचे दर्शन घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम