धक्कादायक! दारू का पितो म्हणून जाब विचारल्याने पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

0
34

द पॉईंट नाऊ ब्युरो : सध्या माणसाची मानसिकता खूपच भयानक पद्धतीने बदलताना दिसून येत आहे. बदलत्या मानसिकतेनुसार हे दिसून येत आहे की, माणूस अधिकच हिंस्र आणि असंवेदनशील होत चालला आहे. अशीच एक असंवेदनशील घटना पुण्यात घडली आहे. अतिशय किरकोळ कारणातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पत्नीने दारू का पितो म्हणून जाब विचारला असता, सनकी नवऱ्याने थेट बायकोची गळा आवळून हत्याच केली. 30 वर्षीय अवंतिका शिवम पचोरी असे मृत पत्नीचे नाव आहे. ही घटना पुण्याच्या हिंजवाडी परिसरात घडली आहे.

शिवम आणि अवंतिका हे दोन्हीही आयटीपार्क येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. शिवम दारू पिऊन घरी आला असता, त्याला अवंतिकाने जाब विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला. आणि या वादात शिवमने अवंतिकाचे डोके भिंतीवर आपटत गळा आवळून हत्या केली. या दोघांना तीन वर्षांची मुलगी देखील आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पती शिवमविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माणसाची बदलती मानसिकता आणि हिंस्रक होत चाललेली वृत्ती ही आज अतिशय चिंतेचा विषय बनलेली आहे. दारूच्या पायी आजवर अनेक संसार उध्वस्त झाले आहेत. आणि अजूनही ते होत आहेत. दारू माणसाचे आयुष्य बरबाद करते असे म्हटले जाते. हे काही चुकीचे नाही. दारूच्याच कारणास्तव माणूस बदलत चालला आहे. यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर येत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here