द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (सिन्नर) : सिन्नर तालुक्यात घोरवड घाट येथे एक कार 150 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री पावणेदोनच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 150 फूट खोल दरीत कोसळली. यात इगतपुरी तालुक्याच्या वैतरणा येथील 30 वर्षीय अंकुश संतु जमदाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इगतपुरी तालुक्याच्या रायंबे येथील अनिल गोपाळ भोर व नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या भगूर येथील नामदेव किसन धांडे हे जबर जखमी झाले आहेत. हे तिघेही टाटा टियागो (MH 15 GL 2747) कारने जात असतांना कारवरील नियंत्रण सुटून कार 150 फुल खोल घाटात कोसळली. आणि 3 ते 4 वेळा कारने पलटी खाल्ली. यात अंकुश जमदाडे मृत्युमुखी पडले. तर इतर दोघे जखमी झाले.
दरम्यान, याबाबत इतर वाहनचालकांनी पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही केली. घोरवड घाटात असलेल्या वळणाचा अंदाज न येऊन अथवा रस्त्यामुळे आजवर वरच अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच कारणास्तव वाहन धारकांना घाट परिसरातून वाहन सांभाळून चालवण्याचे आवाहन केले जाते. मात्र बहुतांश वेळा वाहनधारक सुचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने किंवा इतर कारणामुळे येथे अपघात होतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम