झिरवळांच्या उपस्थित नागरी सत्कार ; देवळा येथे राष्ट्रवादी नेत्यांची मांदियाळी

0
24

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर यांचा नागरी सत्कार होणार आहे. उद्या झिरवळ हे देवळा येथे येणार असून त्यांचा सरकारी दौरा रात्री उशीरा आला आहे. यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाला नवं संजीवनी मिळणार असून बऱ्याच वर्षांनी राष्ट्रवादी पक्षाचा मोठा कार्यक्रम होत असून जिल्ह्यातील सर्व आमदार पहिल्यांदा तालुक्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

जि.प.सदस्य नूतन आहेर यांना नुकतीच अहमदाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ‘नेल्सन मंडेला’ विद्यापीठातर्फे ही पदवी देण्यात आली आहे. याचे औचित्य साधून आज नागरी सत्कार ठेवण्यात आला असून या कार्यक्रमाला अनेक राष्ट्रवादीचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

झिरवळ यांच्या आ. हिरामण खोसकर, आ. नितीन पवार, आ. सरोज अहिरे, मा. आ. संजय चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, काँग्रेसचे अध्यक्ष तुषार शेवाळे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे अशा सर्व दिगगजांच्या उपस्थितीत नागरी सत्कार होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here