बेमोसमी पावसाने घेतला महिलेचा बळी ; वीज पडून महिला ठार

0
39
Lightning over field

नाशिक : बेमोसमी पावसामुळे नुकसान होत असून आज नाशिक तालुक्यातील संसरी (Sansari village Deolali camp area) येथे वीज पडून एक महिला दगावल्याची दुदैवी घटना घडली आहे. सविता बाळासाहेब गोडसे (वय 45) असे या मयत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहतीनुसार आज 9 जून रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या वेळी ही महिला जनावरांना चारा घेऊन मळ्यातून घरी परत येत होती मात्र त्याचवेळी काळाने घाला घातला आहे.

विजांचा कडकडाटसह बेमोसमी पावसाने सर्वात केली असताना महिला घराकडे निघाली मात्र वीज अंगावर कोसळली. या घटनेत या महिलेचे जागीच निधन झाले आहे.

यावेळी सविता यांच्या पाठीमागे काही अंतरावर असलेली मुलगी सुदैवाने यातून बचावली आहे. या महिलेस कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये (Cantonment hospital) दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here