द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (दिंडोरी) : नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील चिल्लरबारीजवळ एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाने येथे एका 5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नळवाडपाडा येथील या पीडित मुलीचे कुटुंब शेती व्यवसाय करते. या नराधमाने 5 वर्षीय मुलीला फूस लावून शेतात नेत तिच्यावर अत्याचार केले. यामुळे तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांना सदर घटनेतील आरोपी हा नळवाडपाडा ते ठेपणपाडा जोरण दसरम्यान असलेल्या जंगलात लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीची सुमारे चार तास वाट पाहत, अखेर सिनेस्टाईल पकडले.
देशात वाढत्या बलात्कार-अत्याचाराच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. कायद्याचा कोणत्याही प्रकारचा धाक अशा नराधमांना राहिला नसल्याचे यातून दिसून येत आहे. नळवाळपाडा येथे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत देशभरात अनेक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे देश पुरता हादरला आहे. संबंधित आरोपींना अटक झाली आहे. मात्र वाढलेल्या या अत्याचाराच्या घटनांनी देशाची चिंता वाढवली आहे. यामुळे पालक वर्गात आपल्या मुलींच्या प्रति चिंता वाढली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम