नाशिक : पोलिस दलाकडून दोन दिवसांमध्ये परिमंडळ एकमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 404 जणांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये पोलिसांकडून पायी गस्त घालण्यावर विशेष जोर दिला जात आहे.
शहरात दीड महिन्यापासून गुन्हेगारीवर डोके वर काढले आहे. मागील 2 दिवसामध्ये किरकोळ कारणावरून 7 खून झाले आहे. यातच 35 हून अधिक सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरी, अपहरण, धारदार शस्त्राने वार करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
कारवाईसाठी विशेष पथक
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील परिमंडळ एक अंतर्गत पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून दोन दिवसांपासून प्रत्येक पथकाच्या मदतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. या पथकांमध्ये एक अधिकारी व सात अंमलदार असून, ते पोलिस ठाणे हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग, कोम्बिंग, अवैध दारू विक्री, टवाळखोर, अवैध जुगार खेळणाऱ्यांस रेकॉर्डवरील, तडीपार आणि हिस्टरी शिटर यांचा कसून शोध घेत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम