नाशिक – वणी जवळ भीषण अपघात; ट्रॅक्टर कारवर उलटून 7 जणांचा मृत्यू

0
14

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक जिल्ह्याच्या वणी जवळ भीषण अपघात होऊन 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. कारवर ट्रॅक्टर उलटल्याने हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक ट्रॅक्टर दोन ट्रॉलीसह मजुरांना घेऊन नाशिक जिल्ह्याच्या वणी येथील मार्कंडेय डोंगराच्या जवळ मुळाने बारीतून जात होता. मात्र ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने, ट्रॅक्टर कारवर कलंडला. यात कार पूर्णतः ट्रॅक्टर खाली दाबली गेली. यात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 12 हुन अधिक जण जखमी आहेत.

दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात वाढत्या अपघातांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. बीड येथे अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर नाशिक जिल्ह्याच्या वणी येथे 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या काळात या घटना अधिक घडलेल्या दिसून येत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here