वाळूची अवैध तस्करी करणाऱ्या वाहनांवर छापे

0
55

येवला (जि. नाशिक) :

छाप्यात वाळूने भरलेला ट्रक (एमएच १५, एफव्ही ५३८५) वरील चालक गणेश शिवाजी नवले (रा. कोळपेवाडी, ता.कोपरगाव) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५५ हजार ३९० अवैध वाळू, ट्रक असा १५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चालक व मालक तसेच वाळू तस्करी करणाऱ्या मालकांविरुद्ध अवैध गौणखनिज वाहतूक व साठवणुक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

छाप्यांमध्ये हायवा ट्रक (एमएच १५, एजी १९५७, एमएच १६ये, एसी ९९३४) व (एमएच १७, बीजेड ६५५५) या वाहनांवरील चालक विलास नागरे (रा. विंचूर, ता. निफाड), देविदास निवृत्ती कानडे (रा. लौकी शिरसगाव, ता. येवला) व ज्ञानेश्वर बुरूंगुले (रा. मीरगाव वावी, ता. सिन्नर) ट्रक चालक व मालक तसेच गौणखनिज वाळूची तस्करी करणाऱ्या मालकांविरुद्ध भादंवि कलम ३७९, ४२०, ४६५,४६७, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८/७ प्रमाणे कारवाई करण्यात आली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here