जून महिन्यात 8 दिवस बंद राहतील बँका; येथे पहा सुट्यांची संपुर्ण यादी

0
22
Big News
Big News

नवी दिल्ली : उद्यापासून जून महिन्याची सुरुवात होत आहे. यावर्षी जूनमध्ये देशातील सर्व सरकारी आणि खासगी बँका 8 दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या या सुट्ट्यांमध्ये 6 विकली ऑफचाही समावेश आहे. तर 2 दिवसीय सुट्टी स्थानिक सणांच्या दिवशी देण्यात आल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जूनची सुरुवात झाल्यानंतर 2 तारखेला बँक बंद राहतील. त्यामुळे जर तुमचं बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर बुधवारी आटपून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँक देशातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ आणि सुट्टी निश्चित करते.

कोणत्या दिवशी बँक बंद राहणार?

जून 2022 मध्ये देशातील सर्व बँक 5, 12, 19 आणि 26 जून रोजी रविवार असल्याने बंद राहतील. तर 11 आणि 25 जून रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय 2 जून रोजी महाराणा प्रताप जयंतीच्या दिवशी शिमला येथे बँक बंद राहील. तर 15 जून रोजी गुरू हरगोबिंद जयंती, वायएमए दिवस, राजा संक्रांतीनिमित्त मिझोरम, भूवनेश्वर, जम्मू काश्मीरमध्ये बँक बंद राहतील. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, पटना, रांची, चंडीगड, जयपूर, रायपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा याठिकाणी केवळ 6 दिवस बँक बंद राहतील.

बँक सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत

2 जून – महाराणा प्रताप जयंती(शिमला)
5 जून – रविवार
11 जून – दुसरा शनिवार
12 जून – रविवार
15 जून – गुरु हरगोविंद जयंती (मुंबईत बँक सुरू राहील)
19 जून – रविवार
25 जून – चौथा शनिवार
26 जून – रविवार

सुट्टीच्या दिवशीही महत्त्वाची कामे पूर्ण होतील

ज्या दिवशी बँकांना सुट्टी आहे त्या दिवशी तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. बँका सर्व ऑनलाईन सेवा पूर्ण महिना सुरू राहतील. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ऑनलाईनद्वारे आर्थिक व्यवहार करू शकाल. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी केवळ शाखा बंद राहतील. एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिटींग मशीन सुरू राहील. त्याशिवाय सुट्टीच्या दिवशी सर्व बँकांचे मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा सक्रीय असतील. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करून तुम्ही बँकांची कामे पूर्ण करू शकाल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here