द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहारात माय-लेकीने स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. देवळाली कॅम्प परिसरात बार्न्स स्कूल जवळ राहणाऱ्या अनिता शिरोळे व राखी शिरोळे असे या माय-लेकींचे नाव आहे.
अनिता शिरोळे यांचे पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार म्हणून काम करतात. मात्र ते कामानिमित्त सोलापूर येथे गेलेले होते. या दोन्ही माय-लेकी एकट्याच घरी होत्या.
या माय-लेकींनी पाळदे मळा परिसरातील मुंबईहून नाशिक रोड कडे येणारा रेल्वे मार्ग गाठला. यावेळी त्यांनी येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस खाली स्वतःला झोकून देत जीवनयात्रा संपवली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात वाढत्या आत्महत्येच्या घटनांनी शहरासह जिल्हा पूर्णतः हादरला आहे. त्यात आता या माय-लेकीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम