दोन बिबटे अन् पहाटेचा अंधार….! ; एकाने केला 45 वर्षीय व्यक्तीवर हल्ला अन् दुसऱ्याने….

0
20

नाशिक प्रतिनीधी : जिल्ह्यात अनेक तालुक्यात बिबट्याचा कहर आहे, सिन्नर तालुक्यातील नांदुर-शिंगोटे (Nandur Shingot) येथे आज एकलव्य नगरमध्ये सकाळी साडे सहाच्या सुमारास ४५ वर्षीय व्यक्तीवर बिबट्याने हल्ला (Leopard attack) केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रहिवासी सोमनाथ महादू मेंगाळ (वय ४५) असे बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव असून मेंगाळ सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर आपल्या वस्ती जवळील विहिरीकडे फेरफटका मारण्यासाठी जात होते.

त्यावेळी अचानकपणे रस्त्याच्याकडेला दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांपैकी एकाने मेंगाळ यांच्यावर हल्ला केला. या हल्यात मेंगाळ यांच्या पोटावर, डाव्या हातावर व डाव्या पायावर जखम झाली. त्यानंतर मेंगाळ यांना दोडी बुद्रुक (Dodi Budruk) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार घेऊन घरी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली असता वनविभागाचे कर्मचारी (Forest Department Staff) घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिसराची पाहणी करून लोकांना सावधानतेचा इशारा दिला. तसेच या ठिकाणी तात्वकाळ वन विभागाने पिंजरा (Cage) लावला आहे. परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांनी केले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here