द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : नांदगांव तालुक्यामधील आमोदेतील सतारी शिवार परिसरामध्येआज दिनांक २८ मे ला दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
आमोदे मधील विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०० या जागेला लागून असलेल्या खाजगी व ग्रामपंचायतिच्या मालकी असलेल्या परिसरात काही मोर मृत्यु होऊन पडलेले असल्याचे शेतकरी दिपक पगार ह्यांनी शेत कामाकरिता जात असताना पाहिले.
या घटनेची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना फोन वरून दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी दाखल झाले. यावेळीस जवळजवळ दहा मोर मृतअवस्थेत पडल्याचे आढळले.
वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रकांत कासार वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, आर के दौंड, एन के राठोड, वनमजूर विकास बोडखे वनपाल सुनील महाले, आदींनी घटनेचा पंचनामा केला.
मोरांचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबतचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत. मृत मोरांमध्ये चार लांडोर व सहा नरांचा समावेश आहे. मोरांचे शेवविच्छेदन करण्याकरिता नांदगांव येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम