द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : जनतेला हैराण करून सोडलेल्या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध उद्यापासून डाव्या पक्षांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हे आंदोलन ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. तरी हे आंदोलन महाराष्ट्रात सगळीकडे जोरदारपणे यशस्वी करावे, असे आवाहन राज्यातील डाव्या पक्षांनी केले आहे. काल भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लाला निशाण पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले- लिबरेशन) यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याप्रमाणे उद्या जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयांवर जनतेच्या वतीने मोर्चे आणि निदर्शने करून केंद्रातील भाजपच्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीते डॉ. उदय नारकर, डॉ. अशोक ढवळे, डॉ. एस. के. रेगे; ‘भाकप’चे तुकाराम भस्मे, सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती ; ‘शेकाप’ चे राजू कोरडे; लानिप’चे राजेंद्र बावके, भीमराव बनसोड आणि भाकप (माले) ‘लिबरेशन’चे अजित पाटील व श्याम गोहील यांनी केले. या आंदोलनास जन आंदोलनांची संघर्ष समिती, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा इत्यादिंचा समावेश असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम