नाशिक येथे 24 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

0
46

नाशिक जिल्ह्यात हत्याकांडचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. पुन्हा एकदा भीषण हत्याकांडचा प्रकार घडला आहे. एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील म्हसरूळ परिसरात ही घटना घडली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतक तरुणाचे नाव राजेंद्र गांगुर्डे हा 24 वर्षीय आहे. तरुणाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करुन त्याला संपवल्याचा प्रकार घडला आहे.

दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने समाजात भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून राजेंद्र गांगुर्डे याची हत्या केल्याचा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राजेंद्रच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here