नाशिक जिल्ह्यात लाच घेतांना ‘ ही ‘ महिला अधिकारी अटकेत

0
47

नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता दीपक पवार (API Pranita pawar) ह्या २० हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यात मोठे यश आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार , भद्रकाली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार यांनी तक्रारदार यांच्याविरोधात दाखल असलेल्या ३७६ सह इतर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच कोर्टात चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी १३ मे २०२२ रोजी केल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबतची तक्रार केली. आज सापळा रचून दिनांक १८ मे रोजी लाचेची रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले होते यावेळी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here