महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू ; डॉक्टर दांपत्याला अटक

0
31

बीड येथील माजलगावच्या जाजू रुग्णालयात प्रसुतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याच प्रकरणी जबाबदार असलेल्या डॉक्टर जाजू यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बीडच्या माजलगाव येथील सोनाली गायकवाड यांना जाजु हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रसूतीदरम्यान अचानक तिची तब्येत अचानक खालावली असता महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. दोघांच्या मृत्यूला जाजु हॉस्पिटलचे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी कठोर भूमिका घेतली.

दोघांच्या मृत्यूला जाजु हॉस्पिटलचे डॉक्टर जबाबदार जोपर्यंत डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नकार दिला आहे. या सर्व प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात पाठवले असता धक्कादायक बाब समोर आली.

जाजु रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची विचारणा केली रुग्णालयातील डॉक्टर विजयकुमार जाजू आणि उर्मिला जाजू याना प्रसूतीदरम्यान कोणते उपचार करायचे याची माहिती नसल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा समोर आले. पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

चौकशी समितीच्या अहवालानंतर मृत महिला सोनाली गायकवडच्या वडिलांच्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिस ठाण्यात जाजु दाम्पत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. उपचार पद्धती माहित नसतानाही चुकीचे उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टर जाजू दांपत्याचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात येईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here