द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : माडसांगवी येथे सासरी नातेवाईकांमध्ये होत असलेल्या मारहाणीत सुनेचा मृत्यू झाल्याची निर्दयी घटना घडली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, आरती विशाल कापसे हीचा मृत्यू झाला आहे. तीच वय २४, रा.माळवाडी माडसांगवी, ता.जि.नाशिक आहे. आरती हिला तिच्या सासरच्या माणसांकडून मागील भांडण पोखरून काढत, शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
मारहाणीनंतर तिक्या पतीने म्हणजेच विशाल याने घराजवळ पडलेल्या लोखंडी फावडा आरतीच्या डोक्यावर व तोंडावर मारून तिला गंभीर जखमी करून ठार केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सासरची माणसं म्हणजेच सुरेश राजाराम कापसे, निवृत्ती शंकर कापसे, शोभा उर्फ अलका निवृत्ती कापसे, बंटी निवृत्ती कापसे, विशाल राजाराम कापसे (सर्व रा.माळवाडी माडसांगवी ता.जि.नाशिक ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी इरफान शेख करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम