भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यात गोंधळ आणि हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांचा पुणे दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला.राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
इंधन दरवाढ व महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीनं स्मृती इराणींविरोधात आंदोलन छेडल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंसह 30-40 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रूपाली ठोंबरे यांच्यासह निलेश निकम, महेश हांडे, उदय महालेंसह इतर अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सेनापती बापट रस्त्यावर बेकायदा इराणींविरोधात आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी झटका दिला.राष्ट्रवादी काँग्रेसनं स्मृती इराणींविरोधात घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, अनुचित प्रकार घडल्याने यासाठी पुणे पोलिसांकडून परिसरात तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम