अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलपंप वरील कर्मचारी आणि तरुणांमध्ये झटापट; व्हिडिओ व्हायरल

0
41

गेल्या काही दिवसांत अहमदनगरमध्ये गुंडगिरीच्या घटना वाढत आहेत. पेट्रोल पंपावर क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वार आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यामध्ये तुफान मारहाण झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील टॉप अप पेट्रोल पंपावर हाणामारी घटना घडली आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाला पंपावरील कर्मचाऱ्याने त्याला गाडी पुढे घेण्याचे सांगितले होते. पण, यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. गाडी पुढे घेतल्यानंतर या तरुणाने कर्मचाऱ्याशी वाद घातली. त्यानंतर बघता बघता दोघांमध्ये झटापट सुरू झाली.

पंपावरच दोघांमध्ये हाणामारी झाली असता काही तरुण दोघांना सोडवण्यासाठी पुढे आले. पंपावरील इतर कर्मचारी मित्राला मदतीसाठी धावून आले आणि या तरुणाला मारहाण केली. पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी भांडण सोडवले. नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंपावरील cctv कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे.त्यामुळे पेट्रोल पंपवर यावेळी एकच गोंधळ उडाला.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here