नाशिकच्या ओझर विमानतळावर रणवे परिसरात पेटला वणवा, 50 एकर क्षेत्र जळून खाक

0
16

काल नाशिक येथे मोठी दुर्घटना होताना टळली आहे. नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हद्दीतील विमानतळावर रणवेवरील 100 मीटर अंतरावर आग लागली आहे. वाळलेल्या गवताला आग लागल्याने 50 एकर परिसरात शुक्रवारी रात्री आगीने पेट घेतला आहे.

नाशिक विमानतळाच्या धावपट्टी जवळ अग्नितांडव दोन दिवसांपूर्वी लागली होती आग – दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या एअरपोर्ट परिसरात अचानक वनवा पेटला होता. यावेळी हजार हेक्टरवर पसरले आगीने रौद्ररूप धारण केले,जवळपास विमानतळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, अशात आसपासच्या परिसरातील अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाली नाही, तसेच विमानतळालाही कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही.

एचएएलचे तीन अग्निशमन बंब तसेच नाशिक, पिंपळगाव बसवंत, येवला येथील प्रत्येकी एक तर येथील एअरफोर्सच्या दोन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने तीन तासांचा प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.दोन तासाच्या अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र यात हजारो हेक्टरवरील गवत व झाडे जळून खाक झाले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून या आगीत 50 एकर क्षेत्रावरील वृक्ष व गवताची हानी झाली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here