नायडोंगरी गटात अश्विनी आहेर यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

0
47

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे नायडोंगरी गटातील हिंगणेदेहेरे गावात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी आहेर यांच्या प्रयत्नातून गेल्या अनेक दिवसांपासून विकास कामांचा धडाका सुरू असून , ग्रामीण भागाचा कायापालट सुरू आहे.

नुकतेसाग करण्यात आलेल्या भूमीजनात हिंगणेदेहरे ते राजदेहरे रस्ता सुधारणा करण्यासाठी 25.00 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तर हिंगणे देहेरे येथील महादेव मंदिर येथे पथदीप बसविणे यासाठी : 3.00 लक्ष मंजुरी आहे.

हिंगणे देहेरे पंचशीलनगर हायमास्ट बसविणे या कामासाठी : 4.99 लक्ष निधी मंजूर आहे.

अशा विविध कामांचे भूमिपूजन जि.प. महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले. अश्विनीताई यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व तिथल्या अडचणी समजून घेतल्या यावेळी शिवाजी बापू बच्छाव , दिलीप बच्छाव , मनोज बच्छाव , माणिक बच्छाव , शरद बच्छाव ,राहुल बच्छाव ,रोशन बच्छाव , हिंमत बच्छाव , कैलास बच्छाव , रतन बागुल, किसन निकम युवराज, पंडित पवार,सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक गेंद, युवा नेते दर्शन आहेर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here