द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कायद्याने चालणारे राज्य आहे, कोणाच्याही अल्टिमेटने नव्हे. कायदा हातात घेणाऱ्यावर कारवाई ही होणारच भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. अशा पद्धतीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. माझ्याकडून नियमांचा भंग झाला तेव्हा मी १३ हजार दंड भरला होता. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. उगाच सामजिक शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी वक्तव्य करू नका. राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यावर भाषणं करा. अश्या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरेंची काल औरंगाबाद मध्ये सभा पार पडली. त्यात त्यांनी शरद पवारांवर थेट टीका केल्याचे दिसून येते. तासाभराच्या भाषणात सुमारे २० मिनिट ते शरद पवारांवर टीका करत होते. पवार जातीय भेद करत असल्याने पुरंदरे ब्राम्हण असल्याने पवारांनी त्यांना त्रास दिला असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या या आरोपांवर राज्यातील नेते खडसून टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर होते तिथे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर धडाडून टीका केली आहे.
अल्टिमेटम द्यायला ही मोगलाई लागून गेली का ? अजित पवारांचा राज ठाकरेंना थेट टोला.
नियम हे सर्वांना सारखे आहेत. कुणीही दादागिरी करू नये. अल्टिमेटम द्यायला ही मोगलाई नाही. नियमांचे पालन करत सभा घेतल्या तर पोलिस कारवाई करणार नाही पण कायदा हातात घेतला तर नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा राज ठाकरेंना दिला. मातोश्री वर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी गेलेल्यांची आज काय अवस्था आहे ह्याच निरीक्षण करावं. राज्यात जे वातावरण तयार झाले आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जाती मध्ये वाद तयार करण्याचे काम काही लोक करत आहेत. सरकार जातीय सलोखा निर्माण करते तरी शांततेचे वातावरण बिघडवण्याचे काम करू नये अन्यथा नक्कीच कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम