Nashik news | नाशिकमधील ८ तालुके, दुष्काळसदृश्य जाहीर अशा आहेत सवलती

0
26
Cracks run through the partially dried-up river bed of the Gan River, a tributary to Poyang Lake during a regional drought in Nanchang, Jiangxi province, China, August 28, 2022. REUTERS/Thomas Peter

Nashik news | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ३ तालुक्यां व्यतिरिक्त आणखी ८  तालुक्यांमधील ४६ महसूली मंडळे दुष्काळसदृश्य म्हणून जाहिर केली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्याला यश मिळाले.

दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती ह्या तालुक्यांना लागू होणार आहेत. असा निर्णय राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केला. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले.

मंत्रालयातील वॉर रूम येथे मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे हे यावेळी उपस्थित होते.

अजित पवार-फडणवीसांच्या जागी कार्तिकी पूजेची मागणी झाल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

बैठकीत मंत्री अनिल पाटील म्हणाले, नुकताच केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील मंडळामध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्के पेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. असा निकष लक्षात घेवून ८ तालुक्यतील ४६ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या जमीन महसूलात घट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविदयालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती ४६ महसूली मंडळात देण्यात येतील असेही मंत्री अनिल पाटील म्हणाले.

मंत्री अनिल पाटील म्हणाले, राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थ्यी शेतक-यांना ५ लक्ष टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणा-या ३० कोटी खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली आहे. जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे नुकसान होणार नाही. नव्याने अस्तित्वात आलेली महसूली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत. तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसूली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Maratha reservation | सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड करू नये- जरांगे पाटील

बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील खालील ४६  महसुल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थीती जाहीर करण्यात आले आहे.

• सिन्नर तालुका
• मालेगाव तालुका
• येवला तालुका
• निफाड तालुक्यातील लासलगाव, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर, निफाड, चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर असे एकूण ९ मंडळे
• नांदगाव तालुक्यातील नांदगाव, मनमाड, वेहेळगाव, जातेगाव, हिसवळ बुद्रुक असे एकूण ५ मंडळे
• नाशिक तालुक्यातील नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर, गिरणारे असे एकूण ८  मंडळे
• कळवण तालुक्यातील कळवण, नवीबेज, मोकभणगी, कनाशी असे एकूण ४ मंडळे
• बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर, डांगसौंदाणे, ब्राम्हणगाव असे एकूण ८ मंडळे
• चांदवड तालुक्यातील चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेरभैरव, वडळीभोई, दिघवद असे एकूण ६ मंडळे
• देवळा तालुक्यातील देवळा, लोहोनेर, उमराणे एकूण ३ मंडळे
• दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी, मोहाडी, वरखेडे एकूण ३ मंडळे

वरीलप्रमाणे ४६ महसूल मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून सामावेश करण्यात आला आहे. उर्वरित तालुके आणि मंडळामधील दुष्काळी परिस्थितीबाबत संपुर्ण माहीती मागवुन पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल. असे जाहीर केले.
Diwali 2023 | धनत्रयोदशीला सोनं खरेदी का करावं?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here