नाशिक राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धेत ५६३ खेळाडूंचा सहभाग

0
23

द पॉईंट नाऊ: नाशिक येथे हौशी रोप स्किपिंग असोसिएशन आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग अजिंक्यपद स्पर्धेचे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. या स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण २१ जिल्हा संघांनी सहभाग घेतलेला आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाज सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, होशी रोप स्किपिंग संघटनेचे अध्यक्ष व आमदार नरेंद्र पवार, क्रीडा भरती प्रांत प्रमुख साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. हौशी रोप स्किपिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आ. नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात पुढील वर्षात राष्ट्रीय स्पर्धा कल्याण येथे आयोजित करू व खेळाडूंना संपूर्ण सुख सुविधा उपलब्ध करून देतील असे जाहीर केले व त्याचप्रमाणे स्किपिंग हे सगळ्या खेळासाठी आवश्यक आहे विविध खेळ प्रकारातला एक प्रकार स्किपिंग खेळासाठी शारीरिक सुदृढतेचा एक भाग आहे व ते कमी जागेत ही आपण करू शकतो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कोरोना काळातला अनुभव नुसार सगळ्यांना स्किपिंग करा असे जाहीर आव्हान केले.

मिल्ट्री व नियमित परेड करणाऱ्या व्यक्तींसाठी, स्किपिंग हे शारीरिक क्षमता व ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त आहे असे सांगितले आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोप स्किपिंग संघटनेचे अध्यक्ष अॅड. शाम बडोदे, संयोजक सुनील निरगुडे, क्रीडा भारती अध्यक्ष विनोद शिरभाते, नासिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, या वर्षी शालेय स्पर्धेत रोप स्किपिंग राज्यस्तरीय स्पर्धा नासिक येथे होतील अशी तयारी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी तयारी दर्शवली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहे. होशी रोप स्किपिंग संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेखा पाटील, महाराष्ट्र मिक्स नेटबॉल संघटनेचे सरचिटणीस स्वप्नील करपे क्रीडा भरती संघटन महिला प्रमुख कामिनी केवट यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये विशेष विद्यार्थ्यापासून क्रीडाशिक्षक क्रीडा प्रशिक्षक क्रीडा संघटन वरिष्ठ पदाधिकारी व पालक वर्ग उत्साह स्वरूपात पुढील कार्यासाठी प्रेरणा दिलया स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शितल विसावे, स्नेहल देव, कामिनी केवट, मंजिरी पाटील, शैलजा जैन, क्षितिजा खटावकर, सोनाली कुलकणी, सुचिता कुकडे, भारती 1 भदाणे, शिवानी पाटील, श्रावणी सांबरेकर, अनुष्का पगारे, साक्षी खोडे, उदय पाटील, हिरामण शिंदे, रश्मीन माळी, सुरेश शिंदे, सुनील दवंगे, गणेश राऊत, नदीम शेख, अतुल पाटील,आनंद ठाकूर, अभिजीत देशमुख, युवराज शेलार, पवन खोडे, वजहत अली, अनिकेत देशमुख, सर्वेश पाटील, प्रशांत गवळी, आशिष पाटे, भावेश नांद्रे, साहिल जाधव, गणेश ढेमसे, रोहन अढांगळे, अमित इंगळे, गौरव ढेमसे, निलेश देवगे यांनी पुढाकार घेतला आहे. सूत्रसंचालन के के अहिरे यांनी तर आभार सुरेखा पाटील यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here