गुजरातचं दहशतवादविरोधी पथक आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांनी संयुक्त कारवाई करत पिपावाव बंदरावर एका कंटेनरमधून हेरॉईन जप्त केलं. गुजरातमधील पिपावाव बंदरातून 450 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. हे ड्रग इराणमधून अमरेली जिल्ह्यातील पिपावाव बंदरात आणलं होतं. जप्त केलेल्या कंटनेरचं वजन सुमारे 9780 किलोग्राम आहे.
“धाग्याच्या मोठ्या पिशव्या असलेलं कंटेनर पाच महिन्यांपूर्वी इराणहून पिपावाव बंदरात आलं होते. अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कनेपोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. धागा हेरॉईनच्या द्रावणात भिजवला आणि नंतर तो वाळवून त्याला गाठीचा आकार देत बॅगमध्ये बांधला गेला. या पिशव्या सामान्य वापरातील दोऱ्याच्या गाठी असलेल्या इथर पिशव्यासोबत मिसळून पाठवण्यात आले जेणेकरुन अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष जाऊ नये.
धाग्यांमधून सुमारे 450 कोटी रुपयांचे सुमारे 90 किलो हेरॉईन सापडलं आहे. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार तपास आणि जप्ती सुरु आहे, असं डीआरआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे. “डीआरआयने डिसेंबर 2021 मध्ये हेरॉईन, कोकेन, चरस आणि सायकोट्रॉपिक पदार्थ यांसारखं ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त केलं होतं. जानेवारीमध्ये 3,300 किलोहून अधिक हेरॉईन, 320 किलो कोकेन आणि 230 किलो चरस जप्त करण्यात आलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम