सुरुवातीला गोंधळ; मात्र आता तांबे आघाडीवर तर पाटिल पिछाडीवर

0
22

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या Nashik Graduate Constituency Electionमतमोजणीस Vote Counting आज सकाळी आठ वाजता सुरूवात झालेली होती. पहिले मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. पुढे मतपत्रिकांचे वेगवेगळे गठ्ठे करून ठेवण्यात आले असून मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार आहेत.यावेळी मतमोजणीच्या सुरुवातील टेबल नंबर १३ वर मतदार प्रतिनिधींची संख्या वाढल्याने गोंधळ झाला होता. मात्र, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे Radhakrishna Game यांनी तात्काळ पोलिसांच्या तुकडीला पाचारण करून दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना बाहेर काढले. त्यानंतर मतमोजणी सुरळीत सुरु आहे.

MLC election: फडणवीसांच्या घरात भाजपचा धुव्वा ; मविआचे आडबोले विजयी

आता पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यातील पहिल्या काही मतांचा अंदाज घेतला असता सत्यजित तांबे Satyajeet Tambe आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील Shubhangi Patil यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु आहे. या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी पहिल्या मतमोजणी फेरीअंती सात ते आठ हजार मतांनी आघाडी घेतल्याचे समजते. तर मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here