निवारा केंद्राचा १८० बेघर नागरिकांना सहारा….

0
52

द पॉईंट नाऊ: शहरात झालेल्या सर्वेक्षणात एकूण ८९४ बेघर लाभार्थ्यांची नोंद झाली असून, त्यापैकी १८० क्षमतेचे कायमस्वरुपी बेघर निवारा केंद्र तपोवनातील नवीन इमारतीत कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरातील बेघर नागरिकांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या निवार्या करिता महापालिकेतील समाजकल्याण विभागामार्फत ५८० क्षमतेच्या निवारागृहाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर केला आहे. त्याअंतर्गत पंचवटी, सातपूर, पूर्व व नाशिकरोड विभागातील चार जागांवर निवारागृह उभारले जाणार आहे.

शहरात बेघरांची संख्या वाढत असून, सिग्नल, मुख्य चौकांमध्ये भिक्षा मागून तेथेच निर्वासित राहत असल्याने प्रमुख रस्ते व चौक अशा बेघरांनी वेढले गेले आहेत. बेघरांच्या कुटूंबातील लहान मुले वाहनधारकांकडून भीक मागतात. यातून शहराचा हलगर्जीपणा समोर येतो. सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी निर्वासित गृहे बांधण्याच्या सूचना महापालिकांना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने गंगाघाटावर निवारागृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वेगवेगळे निमित्त करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला. सन २०१९ साली बेघरांचे सर्वेक्षण झाले. त्यात एकूण ८९४ बेघर नोंदविण्यात आले. त्यानंतर तीन वर्षे सर्वेक्षण झाले नाही. दोन वर्षे करोनामुळे सर्वेक्षण झाले नसल्याचे कारण दिले. जाते. सर्वेक्षणानुसार बेघरांना आसरा देण्यासाठी पंचवटी, सातपूर, पूर्व, नाशिकरोड या चार विभागांमध्ये जागा निश्वित करण्यात आल्या आहेत. एकूण ५८० जणांच्या क्षमतेचे निवारा केंद्र उभारले जाणार आहे. त्या बाबतीतील सविस्तर प्रकल्पाचा अहवाल (डीपीआर) मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्याबरोबरच चेहेडी, वडाळा, तपोवन येथेही निवारा केंद्र उभारले जाणार आहे.

आयुक्तांनी दिलेल्या सूचना

सिग्नलवरील वाढत्या बेघरांची संख्या लक्षात घेता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी निवारा केंद्र तयार करण्या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तातडीने प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या निवारा केंद्रात १८० बेघरांना आसरा देण्यात आला आहे. जून २०२१ पासून संत गाडगे महाराज धर्मशाळा व इंद्रकुड येथे दीडशे ते दोनशे बेघरांना निवारा केंद्रात आसरा दिला जात आहे. सध्या तपोवनातील बेघर निवारा केंद्रात ८१ लाभार्थी आहेत. गाडगे महाराज बेघर निवारा केंद्रात ४२ लाभार्थी आहेत…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here