18 वर्षीय आरोपीने केली मुलीचा बलात्कार करून हत्या

0
47

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ग्वाल्हेर येथे एका 18 वर्षीय आरोपीने गावातील मुलीला प्रेमाचे आमिष दाखवत पळवून नेले. त्यानंतर आरोपीने ट्रकमध्ये मुलीवर तीन दिवस बलात्कार केला.

दरम्यान आधी मुलगी बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात याचा तपास सुरू असताना, आरोपीला याबाबत माहिती मिळाली. या कारणास्तव त्याने मुलीची गळा आवळून हत्या केली आणि मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला.

मुलीच्या मोबाईल मधील चॅटिंग बघून पोलिसांनी सदर आरोपीबाबत माहिती मिळवली. आणि आरोपीस त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here