Crime news | RPF जवानाकडून १७ वर्षीय तरूणीवर बलात्कार…

0
25
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar

Crime news | राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान, एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरसक्ष दलाच्या जवानाने (RPF)  एका १७ वर्षीय मुलीला पाच दिवस डांबून  ठेवत. बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत छत्तीसगडवरून पुण्याला पळून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर आरपीएफ जवानाने बलात्कार केला आहे.  याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरपीएफ जवान अनिल पवार व सिध्दार्थ मल्टिपर्पज सोसायटी संस्थेचा कर्मचारी कमलेश तिवारी अशी ह्या आरोपींची नावे आहेत.  याप्रकरणी  अल्पवयीन पीडित मुलीने तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही दहावीत शिकायला असून छत्तीसगडमध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहे. लीलाधर ठाकूर नावाच्या तिच्या प्रियकराने तिला ‘आपण पुण्याला जाऊन लग्न करू’ असे आश्वासन दिले. १२ सप्टेंबरला ते पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचले. त्यावेळी तीन व्यक्ती त्यांना पोलिसांकडे घेऊन गेल्या. तेथे पोलीस कर्मचारी अनिल पवार याने पीडित मुलगी आणि तिच्या प्रियकराला बराच वेळ बसवून ठेवले.

मराठा आरक्षण | अखेर निर्णय नाहीच; मुख्यमंत्र्यांना हवाय आणखी वेळ!

काम करण्याच्या बहाण्याने अत्याचार

यांनातर आरोपी अनिल पवार याने रेल्वे कॉलनीतील एका खोलीत पीडित मुलीला आणि तिच्या प्रियकराला बंद करून ठेवले व पैशांची मागणी केली. त्यानंतर तिला दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी कमलेश तिवारी याने त्या मुलीला काम करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. तिच्या प्रियकराला सोडून दिले. पण, आरोपींना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते तिच्यावर बलात्कार करत होते.

दरम्यान, पीडित तरुणीचे वडील छत्तीसगड पोलिसांसोबत पुण्यात आले व मुलीची सुटका केली. तिला माघारी घेऊन गेल्यावर तिने छत्तीसगड पोलिसांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. ह्या घटनेमुळे महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

देवळा | पिंपळगांव वाखारी येथे मराठा आरक्षणासाठी पाठींबा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here