राज्यात निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा एकदा बघता येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असून निवडणुका घ्याच ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता सर्व बाजुंनी तयारी सुरू झाली असून 4 मे पर्यंत दोन आठवड्यांत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला आहेत. यामुळे निवडणुक आयोग तयारीला लागला आहे.
राज्यात कुठल्याही क्षणी आचार संहिता लागू करण्यात येईल, कारण 20 मेपर्यंत कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. 12 मे रोजी सुप्रीम कोर्ट महत्त्वाच्या सूचना करणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोग कार्यक्रम जाहीर करेल. 2 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया होण्याची शक्यता सद्या वर्तवण्यात येत आहे.
– पहिला टप्पा हा जुलै -ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता असून या टप्प्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुका घेण्याचं नियोजन असू शकते.
– दुसरा टप्पा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये असेल आणि त्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी मतदान होईल.
– या निवडणुकीसाठी नवे गट आणि गणांची माहिती जिल्हा प्रशासनांनी नुकतीच निवडणूक आयोगाला दिली आहे.
त्यामुळे त्यावर हरकती, सुनावणी आणि अंतिम रचना जाहीर होण्यास उशीर होणार आहे.
– पहिला टप्पा शहरी आणि दुसरा टप्पा ग्रामीण असा कार्यक्रम असू शकतो.
अशा पद्धतीनं 2 टप्प्यांत कार्यक्रम घेण्यामागे निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षेचा विचार आहेच. मात्र मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा जास्त पाऊस पडणाऱ्या भागांचा वेगळा विचार आयोगाला करावा लागू शकतो. कोर्टाच्या निर्णयनुसार निवडणुकीचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम