राज ठाकरे यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या वादावर राजकारणात खळबळ माजली आहे. मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर त्यांच्या समोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. भोंग्यांच्या वादावर नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी विनापरवाना भोंगे तसेच हनुमान चालीसा पठणासाठी नाशिक शहरात थेट उशिरा मध्यरात्री आदेशच काढले. नाशिकमध्ये विनापरवानगी अजान सुरू असताना मशिदीपासून शंभर मीटरच्या अंतरावर नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हण्यास मनाई केली. अन्यथा भोंगे लावल्यास चार महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास थेट 4 महिने तुरुंगवास आणि 6 महिन्यासाठी तडीपार केले जाणार. तर नाशिकमध्ये 3 मे पर्यंत धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी भोंगे लावल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतल्याने हा निर्णय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. तर आता मनसे यावर काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक पोलिसांच्या आदेशानुसार, मशिदीच्या 100 मीटर परिसरात मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांवर अजानच्या 15 मिनिटे आधी व अजान संपल्याच्या 15 मिनिटानंतर भोंगे लावण्यास मनाई. हनुमान चालीसा, भजन, गाणे किंवा भोंगे वाजवल्यास कारवाई आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम