द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: धाराशिव संचलित वसाका कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाच्या बायलर अग्नी प्रदिपन संभारंभ उत्साहात संपन्न झाला दी ९ नोंहेबर रोजी सायंकाळी उशिरा धाराशिव संचलित वसाकाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे बायलर विभागाचे कर्मचारी व चेतन दुसाने यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून ,बांयलर अग्नी प्रदिपन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक अभासाहेब खारे, संदीप खारे , संजय खंदारे , कार्यकारी संचालक श्री अमर पाटील ,क्रुष्णा पाटील , वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव, अध्यक्ष अशोक देवरे ,चिप इंजिनिअर शेलार ,चिप अकाऊंटन कोर, निलेश पाटील सुरक्षा अधिकारी किरण आहीरे कौतीक दळवी,शेतकी अधिकारी सुरेश शिंदे,चिप केमिस्ट् सुर्यवंशी ,कोजन इन्चार्ज संतोष कचोर इंजिनिअर चव्हाण , वाघ , अजित गोविलकर , रनदीवे , वसाका मजदुर युनियनचे उपाध्यक्ष त्रंबक पवार नंदु जाधव बापु देशमुख, दीपक पवार , साहेब राव झाल्टे, समाधान गायकवाड ,सुरज पवार , कौतिक दळवी , प्रभाकर सोनवणे ,अजित मोरे, निंबा निकम ,जितु पाटील, शिवाजी आहीरे, मुन्ना पवार आदीसह शेकडो कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी धाराशिव संचलित वसाका चे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या शी कामगारांच्या थकीत वेतन , ओव्हर टाईम , तसेच रोजंदारी वरील कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात काही कामगारांनी भेट घेऊन चर्चा केली असता , अभिजित पाटील यांनी सांगितले की कारखाना सरळीत सुरू झाल्यानंतर या बाबतीत सकारात्मक विचार करु असे , यासाठी सर्व कामगारांनी योगदान देऊन हा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे असी माहिती वसाका मजदुर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली, युनियन अध्यक्ष अशोक देवरे यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम