१७ वर्षीय मुलीचा बलात्कार करून मुलगी गर्भवती; बिबवेवाडी पोलिसांकडून नराधमास अटक

0
50

पुणे येथे घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक संबंध ठेवून तिला गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भोसरी येथील गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे येथे फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना आरोपी त्यांच्या घरी आला. नराधम अजित बापू कांबळे वय २५ याने फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या मुलीशी गोड बोलत असे. तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवत होता. यातून ती मुलगी गर्भवती राहिली.

घडलेला प्रकार आणि परिस्थिती मुलीने कांबळे याला सांगितली, तेव्हा त्याने तिला गर्भपात करायला सल्ला दिला होता.हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून मार्च २०२२ दरम्यान घडला. ही बाब मुलीने कुटुंबापासून लपवून ठेवली. अचानक मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

यावेळी मुलगी गर्भवती असून २१ आठवड्याचा गर्भ असल्याचे समजले. त्यानंतर मुलीकडे फिर्यादीने चौकशी केल्यावर तिने सर्व प्रकार सांगितला. पोलीस उपनिरीक्षक गादीलवाड यावर पुढील तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here