द पॉईंट नाऊ ब्युरो : आज होळी सणानिमित्त सगळीकडेच उत्साहाचे वातावरण होते. जवळपास दोन वर्षांनंतर कोणत्याही बंधनांशीवाय होळीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
नाशिक जिल्ह्यात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आज सगळीकडेच ठिकठिकाणी होळीची पूजा पार पडली. महिला वर्गाने मोठ्या मनोभावे पूजा करून, श्रीफळ अर्पण करून होळीची पूजा केली. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ या घोषणेने सर्वांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
मागील दोन्ही वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे म्हणावे तसे उत्सव साजरे करता आले नव्हते. मात्र आता कोणत्याही बंधनांशीवाय होळीचा सण साजरा केला गेला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम