हिरे महाविद्यालयात काव्यपुष्प स्पर्धा उत्साहात संपन्न

0
10

नाशिक प्रतिनिधी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी, नाशिक महाविद्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेच्या अध्यक्षा महिलारत्न पुष्पाताई हिरे यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त “काव्यपुष्प” ही काव्यविषयक स्पर्धा व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२ चे उद्घाटन उत्साहात झाले. या कार्य्क्रमचे उद्घाटन प्रसिद्ध कवी व चित्रकार मा. विष्णू थोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे हे होते.

‘कविता ही अस्वस्थ मनाचा ठाव घेते व जगणं सुंदर बनवते. आपल्या मनाला जे भावते ते साहित्यिक शब्दांच्या साहित्याने मांडण्याचे काम करतो. कवितेतून समाजातील वास्तवावर भाष्य केले जाते म्हणून कविता समाजमनाला आनंद देण्यापासून अस्वस्थताही निर्माण करते’ असे उद्गार कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कवी विष्णू थोरे यांनी काढले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी मा. पुष्पाताई हिरे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली व अशा विद्यार्थीभिमुख कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. हे स्पष्ट केले.

मराठी विभागप्रमुख प्रा. विद्या सुर्वे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व विभागातील उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश शेवाळे यांनी केले तर आभार प्रा. ललित राऊत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. विनीत रकिबे, प्रा. सीताराम मुरकुटे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here