हिरावाडीत खून? ; मृतदेह आढळल्याने घातपाताचा संशय

0
50

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिकच्या हिरावाडी येथे एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये हत्येच्या घटनांनी शहराला सध्या हादरवून सोडले आहे. त्यात पंचवटीतील हिरावाडी परिसरात याआधी हल्ल्याच्या घटना नुकत्याच घडून गेल्या होत्या. ज्यात एकाचा मृत्यू झाला. आता पुन्हा याच परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने, घबराटीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित तरुणाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. हिरावाडी परिसरातील दामोदर नगर मधील महापालिका उद्यानाजवळ 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यात संबंधित मृताच्या शरीरावर जखमा दिसून आल्याने, यात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत पंचवटी पोलिसांनी ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, हा मृतदेह हा सुनील त्र्यंबक आरोटे या रंगकाम करणाऱ्या तरुणाचा असल्याचे समोर आले आहे.

पंचवटी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सध्या केली आहे. मात्र यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here