दिलीप बांबळे
सर्वतीर्थ टाकेद प्रतिनिधी : इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे गावचे भूमिपुत्र सेवानिवृत्त सैनिक विजय कातोरे यांना नुकताच २०२२ चा राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला असून नाशिक येथील साप्ताहिक स्वराज आंदोलन व भारतीय पुरस्कार विजेते संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जाणार आहे.
दरम्यान सेवानिवृत्त सैनिक विजय कातोरे यांनी भारतीय सेना दलात जम्मू काश्मीर मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बर्फामध्ये तब्बल सतरा वर्ष देशासाठी सेवा दिली. त्यानंतर ते एक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सेवानिवृत्त सैनिक संघटनेच्या माध्यमातून एक वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला आधार देणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करणे, आर्थिक मदत करणे असे उपक्रम सातत्याने राबविले आहे.
यासोबतच श्री कातोरे यांनी गेल्या पाच सहा वर्षापासून विनाशुल्क विना मोबदल्यात नाशिक येथे भारतीय सैन्यात व पोलीस दलात भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण व मैदान चाचणी उपलब्ध करून दिले आहे.
कोरोना काळात अनेक रुग्णांना मदत,कोविड सेंटर ला हँडवॉश, मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल यांची मदत करणे, देखील श्री कातोरे यांनी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे कोरोना योद्धा म्हणून देखील त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. पाण्यात बुडालेल्या लोकांना शोधन्यास शासनाला मदत केली. यासोबतच इगतपुरी तालुक्यातील पहिले शहीद जवान स्मारक उभारण्यासाठी विजय कातोरे यांनी सुरुवात केली आहे त्यांच्या या गौरवास्पद उत्तम दमदार कामगिरीची दखल नाशिक येथील साप्ताहिक स्वराज आंदोलन व भारतीय पुरस्कार विजेते संघ यांनी घेतली असून त्यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा राष्ट्रीय कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे असे स्वराज आंदोलन चे संस्थापक ,संपादक सुखदेव भालेराव यांनी निवडपत्र देऊन घोषित केले आहे. नाशिक पंचवटी येथे २८ जानेवारीला सकाळी १० : ३० वाजता या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम