नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सेना भाजप मध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. नाशिकचे उपमहापौर आणि माजी आमदार वसंत गीते यांचे चिरंजीव प्रथमेश गीते लवकरच भाजप पक्ष सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांची एक्स्प्रेसइन हॉटेल इथे दोघांची भेट झाली आहे. सेनेने भाजपला जोरदार झटका दिला आहे. भाजपडून या भेटीवर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. शांतपणे भाजपा अजून तरी आहे.
नाशिक महापालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना भाजपने मनसेनेला धक्का देत नाशिकची सत्ता काबीज केली होती.
फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशिक मध्ये सध्या संजय राऊत यांनी स्वत: लक्ष घातले आहे. भाजपला आणखी एक धक्का त्यांनी दिला आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी राऊत यांची भेट घेतली. गीते यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम