द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : पारंपारिक शेतीसाठी लागणारा खर्च त्यातून मिळणारे उत्पादन आणि मिळणारे बाजारभाव हे सर्व तोट्याचे झाले आहे. रासायनिक खतांच्या वारंवार वापरामुळे मातीतील सुपीकता आणि जमिनीची कस कमी होत आहे. जमिनीचा कस हा चिंतेजनक विषय असून, सेंद्रिय शेतीमार्फे कमी कष्टात आणि कोणत्याही हंगामात आधुनिक आंतरराष्ट्रीय रेशीम शेतीमधून नवीन रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते हे इगतपुरी तालुक्यामधील कृष्णनगर येथील शेतकरी सखाहरी (नाना) जाधव यांनी दाखवले आहे.
त्यांच्या हा नवीन प्रयोगाने सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. त्यांनी ड्रीप याच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीची जोड देत दीड एकर शेतीत रेशीम लागवडीचा यशस्वी प्रयत्न केला आहे. पिकवून घेतलेला रेशीमचा पाला किंवा तुती हे अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी याकरिता वीस बाय पन्नास असे शेड उभारले आहे. साधारण तीस दिवसामध्ये या अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालन्याला विकण्या करिता जात आहे.
तुती लागवड हे सहा महिन्यात पहिले पीक येते. रेशीम अळ्यांना बाजारामध्ये ५०० ते ६०० रुपये किलो असा बाजारभाव मिळतो. दरमहिन्यात त्यांना साधारण १ लाख ८० हजार उत्पन्न मिळते. रेशीम पीक अशा नवीन प्रयोगामुळे या वर्षी रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाला ८ ते ९ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.
काही दिवसांआधी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाना जाधव यांना आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे रेशीम श्री पुरस्कार मिळाला आहे.
या अनोख्या प्रयोगात त्यांना त्यांची पत्नी तुळसाबाई, वडीलांसह मुले देखील मदत करतात. त्यांचा या प्रयोगाने तालुक्यातील अनेक शेतकरी पुढे सरसावले आहेत. मुख्य म्हणजे या शेती प्रक्रियेत कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज नसते.
तुती लागवडीकरिता जीवामृत, गांडूळ खत, शेणखत ही सेंद्रिय खत वापरली जातात. जाधव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतात. बेलगाव कुहेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी रेशीम शेती करण्याकरिता त्यांना प्रोत्साहित केले.
शेतीसाठी मार्गदर्शन महाराष्ट्र रेशीम संचालनालय चे सह संचालक दिलीप हाके, जिल्हा रेशीम तांत्रिक आधीकारी सारंग सोरते, महेंद्र ढवळे हे आवश्यक ते मार्गदर्शन करतात. रेशीम उद्योगाने पैसे तर मिळालेच परंतु मानसन्मान देखील मिळाला ज्यामुळे कुटुंबातील व्यक्ती आनंदाने व्यवसाय करतात. त्यांचा मोठा मुलगा राहुल याने कोल्हापूर विद्यापीठातून सेरी कल्चर डिप्लोमा केला आहे आणि त्याचा ही फायदा रेशीम उद्योग करताना होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम