माधुरी रोहम
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सुरक्षिततेसाठी तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्हीची नितांत आवश्यकता आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत, असे प्रतिपादन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.
सिडको येथील प्रभाग क्रमांक 25 मध्ये 100 सी.सी टी.व्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना महानगर प्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हार्षाताई बडगुजर यांच्या एक वर्षाच्या संयमी या नातीच्या हस्ते झाला त्यावेळी बडगुजर बोलत होते.
सिडको परिसर गुन्हेगारीमुक्त करण्याचा मानस असून त्याची सुरुवात प्रभाग 25 मध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून होणार आहे. घर,सोसायटी, हॉटेल्स, रस्ते, कार्यालये बँका आणि जेथे रोखीचे व्यवहार होतात आशा ठिकाणी सीसीटीव्हीची आवश्यकता आहे,असे सांगून संपूर्ण सिडको आणि नाशिक महानगरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील राहू,असेही बडगुजर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले
नगरसेविका हर्षाताई यांनीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे फायदे लोकांच्या निदर्शनास आणले. महिला वर्गाच्या सुरक्षिततेसाठीही ही यंत्रणा खूप उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागेश्वर महादेव मंदिर चौक,राजमाता जिजाऊ क्रिडागंण सावता नगर,सुभाष चंद्रबोस गार्डन,सुर्योदय काॕलनी गार्डन,या परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत
यावेळी विमलबाई जाधव, पुष्पा गायकवाड, उषा दुसाने, रंजना प्रधान, मंगला चिंचोरे, जयश्री दौंड, सुनंदा साळुंके, मंगल पगार, विमल माळी, मनीषा शिंदे, नारायण शिंदे, गोपी गिलबिले,नानासाहेब निकम,-विलास वाघ, शिवाजी बोडके,रवी शट्टी, बाबाजी अहिरे, लीलाधर रडके, शंकरराव वाघ, पद्माकर विसपुते, आत्माराम आढाव, डॉक्टर महेश, निकम, भटू मराठे, हरीभाऊ आढाव,शालिग्राम चव्हाण, केशव भुज, पुंडलिक वाघ, निलेश कुलथे, सुभाष सुरासे, विलास वाघुडे,भारत शेळके,एस आर पाटील, गोपीनाथ सोनवणे, शामराव महाजन,भगवान राजोळे, सुरेश कोळकर आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम