द पॉईंट नाऊ ब्युरो : एका मुलीसाठी तिचा बाप हिरो असतो. मात्र एका बापाने बाप – लेकीच्या या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
मुलीसाठी तिची अब्रू ही सर्वात मोठा दागिना असते. मात्र झारखंड राज्यात एका बापानेच वासनेच्या आहारी जाऊन पोटच्या मुलीसोबत गैर कृत्य केले.
गढवा जिल्ह्यातल्या भगनाथपुर भागात एका बापाने दारूच्या नशेत पोटच्याच मुलीवर बलात्कार केला. जेव्हा त्याची नशा उतरली, तेव्हा हा नराधम पसार झाला.
सदर आरोपीची पत्नी ही माहेरी गेलेली होती. आणि त्यांची 17 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. या नराधम बापाने दारूच्या नशेत आपल्याच मुलीबाबत घाणेरडा विचार करून तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर मुलगी आणि तिच्या आईने भगनाथपुर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम