सासू सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ‘जावयाची’ आत्महत्या

0
221

द पॉईंट नाऊ ब्युरो ; जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे एका तरुणाने सासू- सासऱ्यांच्या छळाला कंटाळून गळफास घेतला आहे, (२८ नोव्हेंबर) सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. या युवकाने आत्‍महत्‍येपुर्वी मोबाईलवर ‘मिस यु बेटा’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील शिरसोली येथील अशोकनगर परिसरात राहणारा अमोल प्रकाश धनगर (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा युवक बकरी चारत असल्‍याने तो बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री झोपायचा. शनिवारी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले तो गेला नाही तो घरीच झोपला. या दोघा पती पत्नीत वाद झाल्याने त्याची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे. या नैराश्यातून त्याने आपले जीवन संपवले आहे.

वडील सकाळी घरी आले असता त्यांना अमोल हा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतलेला होता. यावेळी वडिलांनी आरडाओरडा केल्‍याने परिसरातील नागरीक जमा झाले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. अमोल त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, पत्नी, वडील, भाऊ आहे.

सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात

अमोलने व्‍हॉटस्‌ॲप स्‍टेटस्‌ व सुसाईड नोट लिहून ठेवली. ‘आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे’. कारण माझी सासू आणि सासरा रा. रत्नपिंप्रीचे आहे. ते मला फार त्रास देतात आणि फोनवरती धमकीपण देतात. म्हणून मी माझी जिवन यात्रा संपवत आहे. यांच्यावर कठोर कारवाई करा, ही नम्र विनंती. माझा बकरीचा व्यवसाय आहे. त्या बकऱ्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे. जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा आहे. आय मिस यु बेटा, असे म्हणत अमोल याने आत्‍महत्‍या करण्यापुर्वी सुसाईट नोट लिहिली. हि सुसाईड नोट अमोलच्‍या खिशात सापडली. यात त्याने सासू सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून जीवनयात्रा संपवत असल्‍याचा उल्‍लेख आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here