‘सामना’ अग्रलेख नाशिकच्या बॅनरवर ; सेना भाजपात पुन्हा तणाव

0
11

नाशिक प्रतिनिधी : काल दिवसभर ज्या घटनेचे पडसास उमटले ती घटना म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काल रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर गोंधळ उडाला होता. राणेंच्या अटकेची ठिणगी पडली ती नाशिकमधूनच. नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केला. आणि त्यानंतर एक पथकही राणेंच्या अटकेसाठी धाडण्यात आले होते.

यानंतर आज सामना अग्रलेख काय असणार याची उत्सुकता लागली होती. आज सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आणि पुन्हा वादाला तोंड फुटले अग्रलेखावरील बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. यानंतर अनेक टीका टिपण्णीदेखील झाली. हे सर्वकाही सुरु असतानाच या अग्रलेखाचे पोस्टर चक्क नाशिक मध्यच्या भाजप आमदार आमदार देवयानी फरांदे यांच्या घराकडे जाणाऱ्या चौकात शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी लावल्यामुळे वातावरण पुन्हा बिघडले.

आजचा सामनाचा अग्रलेख म्हणजे राणेंनसाठी पदवीप्रदान सोहळाच होता. अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको-नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. अग्रलेखात राणेंना 5 उपमा दिल्यात त्यात . भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केला. यामुळे राणेंचे कार्यकर्ते अग्रलेख वाचून पुन्हा भडकले.

नाशिक सेना पदाधिकाऱ्यांनी तर पोस्टर लावून ठिणगी टाकली. ज्या ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहे तिथे पोलीसही दाखल झाले होते. त्यांनी हे वादग्रस्त पोस्टर काढण्यास सांगितल्यानंतर शिवसेनेच्या बोरस्ते यांनी नारायण राणे कोण आहेत हे जनतेला समजू द्या असे सांगत पोस्टर उतरविण्यास नकार दिला. यानंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी मोट बांधली असून ते पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले व पोस्टर हटवण्याची मागणी त्यांनी केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here