प्रसाद देविदास बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सुरत शिर्डी सप्तशृंगगड या महामार्गावर कुंदेवाडी रेल्वे गेट ते गहू संशोधन केंद्र या दरम्यान मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या मार्गावरून गुजरातला जाणार्याची मोठी वर्दळ असते ,निफाड पिंपळगाव दरम्यान या मार्गाचे रुंदीकरण झाले,नवीन हायब्रीड तंत्रज्ञानाने या मार्गाचे डांबरीकरण झाले पण मध्य रेल्वेच्या निफाड रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे गेटच्या पूर्व व पश्चिम बाजूला तसेच कांदा चाळ ते गहू संशोधन केंद्र या दरम्यान मोठाले खड्डे पडल्याने हे थोडे अंतर पार करताना वाहन चालकांना खूप वेळ लागतो शिवाय वाहने खड्ड्यातून चालवावे लागत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे.
या मार्गावर डांबरीकरण रुंदीकरण होऊनही पूर्वीसारखाच त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल चालक घसरून पडले आहेत
स्पीड ब्रेकरचा अतिरेक
या मार्गावर रौळस या गावाजवळ 3 व पुढे माध्यमिक शाळेजवळ 2 असे 600 मीटरच्या दरम्यान एकूण 5स्पीड ब्रेकर टाकून ठेवले आहे,तसेच पिंपळगाव रानमळा ते पेट्रोल पपं या दरम्यान 5 स्पीड ब्रेकर केले आहेत या स्पीड ब्रेकरची कोणतीही सूचना माहिती फलक,पांढरे पट्टे न टाकल्याने वाहनांच्या लक्षात न आल्याने वाहने उंच उडून अपघात होत आहे,मुळात स्पीड ब्रेकर टाकायला बंदी असून ते का टाकले असा प्रश्न निर्माण झालाआहे?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम