सहारा समूहाचा घोटाळा; आरोपींना अटक करण्यासाठी मध्य प्रदेश पोलीस लखनऊला रवाना

0
34

the point now: सहारा इंडिया समूहाच्या गुंतवणूक योजनांमधून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रता रॉय आणि त्यांची पत्नी स्वप्ना रॉय यांना ताब्यात घेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे पथक आज लखनऊमध्ये दाखल झाले आहे. सुब्रता रॉय यांना तात्काळ अटक होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील गुना जिल्हात सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात डिसेंबर 2021 मध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. या रॉय दाम्पत्य आणि सहारा समूहातील आठ संचालकांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

मात्र गेल्या सहा महिन्यात या प्रकरणी संथगतीने चौकशी सुरु असल्याने सहारा ग्रुपच्या एजंट्सनी पोलीस महासंचालनाकडे तक्रार करत आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. या आर्थिक घोटाळ्यात सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याने योजनांसाठी काम करणाऱ्या एजंट्सना गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रता रॉय आणि त्यांची पत्नी स्वप्ना रॉय यांच्यासह आठ जणांविरोधात मध्य प्रदेशातील भितरतवार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणाने दुप्पट परतावा मिळेल या अपेक्षेने सहाराच्या योजनेत 6 लाख 65 हजारांची गुंतवणूक केली होती. मात्र वर्ष 2020 मध्ये चौकशी केली असता त्याला कोणतेही उत्तरं मिळाले नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने आता सुब्रता रॉय, स्वप्ना रॉय, कंपनीचे संचालक जयव्रतो रॉय, शिवाजी सिंह, ओमप्रकाशश्रीवास्तव , राजेंद्र श्रीवास्तव, संजय नरेंद्र आणि इतरांविरोधात अटक वॉरंट काढले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here