समाजश्री डॉ. प्रशांत हिरे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीराने साजरा

0
186

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी परिवहन मंत्री व समाजश्री डॉ. प्रशांत हिरे यांचा आज वाढदिवस सामाजिक उपक्रम रक्तदानाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अर्पण रक्तपेढीच्या सौजन्याने जवळपास २१ विद्यार्थी व प्राध्यापकांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. याप्रसंगी आपल्या उद्घाटनपर मनोगतात त्यांनी रक्तदानाबरोबरच “रक्त गट संचयन” करणे हि संकल्पना व रक्त गटाचे महत्व विषद केले.

जेणेकरून रक्तदात्याला संपर्क करून तत्काळ सेवा प्रदान करणे शक्य होऊ शकते. या संकल्पनेवर देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी राज्याचे माजी परिवहन व राजशिष्टाचार मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनिय योगदानाबद्दल जीवनसाधना गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. असे उदगार काढून यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थितांचे स्वागत केले.

तसेच रक्तदान करणारे प्राध्यापक व एन. सी. सी. आणि एन. एस. एस. विभागातील स्वयंसेवक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याच बरोबर आरोग्य जनजागृती या विषयाच्या अनुषंगाने डॉ. प्रिया देसाई. यांनी “मौखिक स्वच्छता आणि काळजी” या विषयावर देखील दूरदृश्य प्रणाली द्वारे विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. तसेच आजच्या या रक्तदान प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. विनोद दसपुते यांनी ६७ व्यांदा रक्तदान करून समाजिक बांधिलकी जपून खूप मोठे योगदान केले त्यांच्या या कार्यास महाविद्यालयाकडून भरभरून कौतुक करण्यात आले. .

कार्यक्रमाचे आयोजन एन. सी. सी. विभाग प्रमुख प्रा. सचिन सोनवणे व एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. व्ही. मोरे, कनिष्ठ महाविद्यालय एन. एस. एस. अधिकारी श्री जी. डी. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एन. बी. पवार, उपप्राचार्या डॉ. सुचेता सोनवणे, डॉ. एस. डी. पाटील, डॉ. मृणाल भारद्वाज, डॉ. विनीत रकिबे, डॉ. संतोष चोबे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here